top of page
Strip.jpg

कोकण विकास 
दशसूत्री

 

१. कोकणच्या शेतीचा विकास, फळे, भाजीपाला, मसाला पिके, भातशेती, फुले, रेशीम इ.- प्रशिक्षण, मार्गदर्शन, वित्त आणि विपणन सुविधा, नाबार्डच्या योजना, केंद्र आणि राज्यशासन योजना आणि पायाभूत सुविधा, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, निधी कंपन्या, मायक्रो फायनान्स इ. 

२. कोकणातील उद्योगांचा विकास: लघु उद्योजकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, वित्त आणि इतर सुविधांची मदत, सिडबी आणि बँकांच्या इतर योजना, उद्योगांसाठीच्या अनुदान योजना  

३.  संस्थात्मक सुविधा: शेती, फलोत्पादन, दूध उत्पादन आणि डेअरी, पर्यटन आणि हॉटेल्स-रिसॉर्ट्स विकास, भाजीपाला, फळप्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्प, मत्स्य प्रक्रिया प्रकल्प, फूड पार्क, कोल्ड स्टोरेज, गोदामे, क्लस्टर, औद्योगिक वसाहती इ. साठी मदत आणि सहाय्य

४. तरुणांसाठी, करियर मार्गदर्शन, उत्तम शाळा आणि कॉलेजेस, अद्ययावत तंत्रज्ञान, इंग्रजी, परदेशी भाषा आणि तांत्रिक-अतांत्रिक स्किल डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा मार्गदर्शन, कोकणच्या विद्यापीठासाठी आणि कोकणातील शिक्षणाच्या विकासासाठी प्रयत्न 

५ अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र ,हॉस्पिटल्स आणि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल्स साठी प्रयत्न, कोकणात एम्स आणण्यासाठी प्रयत्न

६. विविध केंद्र आणि राज्य संस्था, मंडळे, केंद्र आणि राज्याच्या प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठीच्या योजना कोकणात याव्यात यासाठी प्रयत्न

७. जलसंधारण, हरित आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, शुद्ध पाणी इ. साठी प्रयत्न

८. महिला, बाल, वृद्ध आणि सर्व समाजघटकांच्या सामाजिक प्रगतीसाठी आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न

९. कोकणच्या सांस्कृतिक विकासासाठी, कला, क्रीडा क्षेत्रात कोकण आणि कोकणातील तरुण विकसित व्हावा यासाठी प्रयत्न

१०.कोकणात आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत विकसित व्हाव्यात यासाठी शासनाकडे प्रयत्न

 

image.png

रायगड 

रायगड जिल्हा, तांदळाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. औद्योगिक वसाहती, मुंबई आणि पुण्याशी असलेली जवळीक आणि आता मुंबई ३.० प्रकल्पामुळे, रायगड वेगाने विस्तारत आहे. 

रत्नागिरी

विस्तीर्ण पसरलेला रत्नागिरी हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे तसा, सुंदर शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि अर्थात पर्यटनासाठी सुद्धा! संधीचे मोठे आगार घेऊन रत्नागिरी आज उभा आहे.

सिंधुदुर्ग

शिवछत्रपतींचा मालवण किल्ला डौलाने मिरवत असलेला सिंधुदुर्ग, देवगड हापूस पासून, हातसडीचा उकड्या तांदळापर्यंत, कुडाळच्या एमआयडीसी पासून ते सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांपार्यंत, सिंधुदुर्ग अनेक विकासाची दालने उघडून उभा आहे.

पालघर

पालघर नैसर्गिक साधनसंपत्ती, आदिवासी संस्कृती, कृषी, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे. मुंबईशी असलेली जवळीक, बोईसर–तारापूर औद्योगिक पट्टा, डहाणूतील चिकू उत्पादन, किनारपट्टी आणि वारली कला यांमुळे पालघरमध्ये आर्थिक विकासाच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

शेती- उद्योग आणि ग्रामीण भागासाठी शासनाच्या योजना आणि इतर मार्गदर्शन

उद्योगासंबंधी मार्गदर्शन

image.png

कोकण ग्रामप्रबोधक 

 

कोकणातील गावागावांमध्ये परिषदेला असे तरुण हवे आहेत जे त्या गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असतील. गावांमध्ये प्रबोधक च्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन करू शकतील, करियर, कृषी, उद्योजकता, शासकीय योजना यांचे  मार्गदर्शन, विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन, परिषदेचे विविध उपक्रम गावांमध्ये राबवणे, स्पर्धा घेणे, कोकणातील विविध क्षेत्रातील उदयॊन्मुख प्रतिभा शोधून काढणे यासाठी मदत करतील.  

Blogs

२७ मार्च २०२६

उपक्रम

चंदन लागवड” कार्यशाळा उत्साहात संपन्न;

कोकणातील शेतीला नवे दिशादर्शन

​

दापोली : प्रबोधक संस्था आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चंदन लागवड” या विषयावरील कार्यशाळा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत कोकणातील शेतीसाठी पर्यायी व उच्च मूल्य असलेल्या पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

​

कार्यशाळेत विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी चंदन लागवडीची तांत्रिक माहिती, लागवडीचे नियोजन, बाजारपेठेतील संधी आणि व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. लातूर येथील महाराष्ट्र चंदन कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अमोल रोनगे यांनी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करून सहभागी शेतकऱ्यांना व्यावहारिक दिशा दिली.

याशिवाय खैर वृक्ष लागवडीवरील विशेष सत्रही आयोजित करण्यात आले. कार्यशाळेनंतर सहभागींसाठी विद्यापीठातील नर्सरी आणि चंदन लागवडीच्या प्रक्षेत्राची पाहणी आयोजित करण्यात आली, ज्यामुळे प्रत्यक्ष शेतीची समज अधिक दृढ झाली.

 

या कार्यशाळेत वसई ते सावंतवाडी परिसरातील तसेच मुंबईत वास्तव्यास असलेल्या आणि कोकणात शेती करण्याची इच्छा असलेल्या ‘अर्बन शेतकऱ्यांचा’ उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.

 

कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन शिल्पा राठोड यांनी केले. या उपक्रमामुळे सहभागी शेतकऱ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर शेतीविषयी नव्याने प्रेरणा मिळाली.

 

कोकणातील ओसाड पडलेल्या जमिनींचा योग्य वापर करून चंदन, हळद, मसाला पिके, साग, खैर आणि बांबू यांसारख्या उत्पन्नवाढ करणाऱ्या पिकांकडे वळण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. स्थानिक तसेच मुंबई-पुणे परिसरातील कोकणवासीयांनी या संधींचा लाभ घेतल्यास कोकणच्या विकासाला नवी गती मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

470860.jpg
471514.jpg

         व्हिडीओ

Kokan Business Directory

ENROL YOUR NAME

  • facebook-square
  • Twitter Square
bottom of page